Monday, February 28, 2022

उल्का

 पुस्तकाचे नाव : उल्का 

प्रकार : कादंबरी

लेखक : वि.स.खांडेकर

प्रथमावृत्ती : १९३४

सद्य प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठसंख्या : १७०



एकूण २५ भागांत रचलेली ' उल्का' कादंबरी ; तिच्याविषयी थोडं काही ,

                 उल्का तत्वं शिकवून जाते. मन भरून येईतोवर प्रत्येक पात्र समोर येऊन बोलू लागतं तेव्हा , जाणीव होते की आपण वाचताहोत ही कलाकृती कल्पित का असेना पण भाव - बंधांच्या प्रवाहात वाहवून नेणारी होडी आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर ' काहीतरी केलं तरंच कर्तृत्त्व राहतं' यापेक्षा ' तत्वानं जगला तर खरा माणूस उरतो ' यावर अधिक विश्वास बसतो.

                 उल्का , तशी साधी , सरळ , सोपी मुलगी ! हुशारी जन्मतःच तिच्यात असावी पण ; भावनांच्या घुसळणीत हुशारी टिकेल कशी हेही तितकंच खरं !

                या कादंबरीत ' उल्का ' नावाची मुलगी , तिचे शिक्षक वडील ज्यांनी पुनर्विवाह केलेला ; तिचे काही सवंगडे आणि कालांतराने आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांवर समोर येणारे पुरुष ; वसंत , माणिकराव , बाबुराव आणि चंद्रकांत !

                चंद्रकांताची चुणूक भलतीच महान ! तो , त्याची पत्रं , त्याचा समुद्र , त्याचे भाऊ , त्याची उल्का , त्याची कल्पना , त्याचा निडरपणा आणि त्याचं देशप्रेम ; हा सारा प्रवास अस्सा डोळ्यांसमोर घडतोय असा दिसू लागतो.

                कोकणचं , समुद्राचं विसंनी केलेलं वर्णन , भाऊंच्या मतांची अर्थात तत्वांची मांडणी इथपासून ते चंद्रकांताचं अधिक प्रेम कोणावर हे अवघ्या सहा - सात ओळींच्या संवादातून सांगून क्षणात मनाला एखाद्या काट्याचा प्रेमळ ओरखडा उमटतो आणि उल्केप्रति प्रेम निर्माण करून जातो. बाकी इतकंच की , विसंची फार फार ओढ वाटू लागते.


5 comments:

  1. उल्का या कादंबरी बद्दल वाचन खूप छान वाटल. आवर्जून पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली .असेच ब्लॉग इथून पुढे ही लिहीत जा.
    त्यामुळे विविध पुस्तकांची आम्हाला ओळख होईल.
    पुढील ब्लॉगसाठी शुभेच्छा👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्कीच , मी प्रयत्न करेन.
      खूप खूप धन्यवाद 😊

      Delete
  2. कादंबरीचे केलेले थोडक्यात पण समर्पक समिक्षण कादंबरी वाचण्याची ओढ लावत आहे. आणि हेच ब्लॉग लिहिण्याचे यश आहे. पुढील ब्लॉग लिहिण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. हो मी प्रयत्न चालू ठेवेन
      खूप खूप धन्यवाद !

      Delete
  3. छान ! लिहीत राहा तेवढंच एखादं बरं काम करतो आपण.

    ReplyDelete

"Seminar Report : Reforms in Criminal Laws"

One-Day Workshop on : Reforms in Criminal Laws (Under the lead college scheme of Shivaji University, Kolhapur) Date: 18th March 2025 Venue:...